परंडा (प्रतिनिधी) - राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेच्या पात्र लाभार्थीच्या धनादेशाचे तात्काळ वाटप करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजीक न्याय विभागाच्या वतीने बुधवार दि.3 रोजी जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली तहसिलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

तहसिलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की कर्ता पुरुष मयत झाल्या नंतर त्यांच्या वारस पत्नीला शासनाकडून 20हजार रूपयाचे अर्थसहाय्य करण्यासाठी संजय गांधी निराधार योजनेतुन लाभार्थीला धनादेशाद्वारे वाटप करण्यात येत होते मात्र यात बदल करून अर्थसहाय्य बँक खात्यावर ऑनलाईन जमा करण्याचे निर्देश आले आहेत.परंतु ही किचकट प्रक्रिया असल्यामुळे सदरील रक्कम जमा करण्यात अडचणी येत असल्याचे वारंवार संबंधीत कर्मचा-याना सांगीतले आहे.मात्र यात बदल करण्यात आला नाही या कीचकड प्रक्रियामुळे योजनेतील पात्र लाभार्थीना मागील दोन वर्षापासून समंधीत रक्कमेचे वाटप करण्यात आलेले नाही. त्यामुळे शासन पात्र लाभार्थीची फरफट करीत असल्याचे दिसून येत आहे.

मागील दोन वर्षांपासून मंजूर असलेल्या पात्र लाभार्थीना तात्काळ अर्थ साहाचाच्या धनादेशाचे वाटप करण्यात यावे.तात्काळ धनादेशाचे वाटप न कल्यास राष्ट्रवादी कॉग्रेस सामाजीक न्ययविभागाच्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असे तहसिलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी जिल्हा सरचिटणीस घनश्याम शिंदे ,बिभिषण खुणे, भाऊसाहेब ओहाळ, महादेव लोकरे, अंकुश ओहाळ, सौ. रत्नमाला निकाळजे, पांडुरंग मिसाळ, गजानन गोरे, शिवजी गायकवाड, अप्पा गायकवाड, मनोज पिंपरकर, दशरथ चाबुकस्वार, सोमनाथ गायकवाड, शैला पोतदार, कुंडलिक शिंदे, नितिन ओहाळ, रुपेश बनसोडे आदी उपस्थित होते.


 
Top