परंडा (प्रतिनिधी) - महिलांनी चूल आणि मूल या संकल्पनेच्या बाहेर निघून देशांमध्ये होणाऱ्या घडामोडी कडे लक्ष दिले पाहिजे असे मत माजी प्राचार्या डॉ.दीपा सावळे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त बुधवार दि.3 रोजी आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालय परंडा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ जयंती उत्सव सप्ताह निमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे व उद्घाटक म्हणून माजी प्राचार्या डॉ.दीपा सावळे या उपस्थित होत्या.

व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.महेशकुमार माने, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.शहाजी चंदनशिवे, कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा.किरण देशमुख , विवेक वाहिनीचे समन्वयक प्रा.डॉ.विद्याधर नलवडे व युवती मंचाच्या समन्वयक प्रा.शेख एम या उपस्थित होत्या . यावेळी शैक्षणिक वर्ष 2023 - 24 मधील युवती मंचाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.शेख एम यांनी केले. पुढे बोलताना प्राचार्या डॉ.दीपा सावळे म्हणाल्या की या महाराष्ट्र राज्यांमध्ये व देशांमध्ये शिक्षणाने जी प्रगती झाली आहे.त्याचे श्रेय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनाजाते.समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी त्यांनी चिखल दगड सोसले परंतु त्यांच्यापुढे जे ध्येय होते त्यांनी ते पूर्ण केले.त्यांना देशामध्ये क्रांती हवी होती आणि ती क्रांती आज सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच झालेली आहे.त्यामुळे आज या देशांमध्ये राष्ट्रपती पदापर्यंत महिला कार्यरत आहे.महिलांनी दर्जेदार शिक्षण घेऊन गुणवत्ता निर्माण करावी . अंधश्रद्धेपासून कोसो दूर व्हावे.घराची समाजाची व देशाची प्रगती केवळ महिला मुळे होते.त्यामुळे महिलांनी सक्षम बनले पाहिजे.आज देशांमध्ये जी क्रांती झाली आहे ती केवळ महिलामुळेच समाजामध्ये आज महिलावर अनेक अन्याय अत्याचार होतात.परंतु महिला त्या सहन करतात कारण त्यांना आपली जबाबदारी आपले हक्क याची जाणीव नसते त्यासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी कॉपीमुक्त परीक्षा देऊन स्वतःमध्ये गुणवत्ता निर्माण केली पाहिजे तरच आपले घर समाज आणि देश पुढे जाऊ शकतो. 

यावेळी डॉ.महेशकुमार माने यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की गेल्या अनेक वर्षापासून या महाविद्यालयांमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले युती मंचाच्या माध्यमातून मुलींना व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते त्याचाच एक भाग म्हणून या महाविद्यालयातून अनेक मुली मोठ मोठ्या पदावर कार्यरत आहेत.

डॉ.विद्याधर नलवडे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला व विवेक वाहिनी विभागासंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शेवटी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सातव एन आर यांनी केले तर सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.शहाजी चंदनशिवे यांनी आभार मानले.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील कनिष्ठ वरिष्ठ विभागातील विद्यार्थी विद्यार्थिनी प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रंथपाल डॉ.राहुल देशमुख शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी दत्ता आतकर , हनुमंत मार्तंडे , रामराजे जाधव ,उत्तम माने ,अरुण माने यांनी सहकार्य केले . यावेळी वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रकाश सरवदे डॉ.सचिन चव्हाण प्रा.विजय जाधव प्रा.कीर्ती नलवडे प्रा.प्रतिभा माने डॉ.वैशाली थोरात श्रीमती देशमुख प्रा.सातव आदी उपस्थित होते.


 
Top