धाराशिव (प्रतिनिधी)- ज्या माणसांना 40 वर्ष शरद पवार यांनी आमदार, खासदार व मंत्री केले ती माणसे या उपकाराची कसलीही तमा न बाळगता ते क्षणात त्यांची पवार यांची साथ सोडून केवळ मंत्रीपदाच्या आशेपोटी भाजपमध्ये गेली. मात्र मी व आमदार कैलास पाटील चालू खोका पेटीच्या जमान्यात कोठेही न डमगता शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विश्वासाल तडा न जाऊ देता खंबीरपणे आम्ही व सर्व शिवसेना पदाधिकारी ठाकरे यांच्या पाठीशी आहोत. असे प्रतिपादन खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी शिवसैनिकांच्या कार्यशाळेत व्यक्त केले.
धाराशिव येथील समर्थ मंगल कार्यालयात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने धाराशिव तालुक्यातील पदाधिकाऱ्यासाठी संघटन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानापुर्वी मी जनतेला आपल्या घरातील व्यक्ती, भाऊ म्हणून मतदान मागीतले व याच जनतेच्या आर्शीवादाने या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करत आहे. अहोरात्र सर्वसामान्य शेतकरी, मतदार यांच्या लहानसहान अडी-अडचणी सोडवण्याचा प्रामणिकपणे प्रयत्न करत आहे. ज्यावेळी कोरोनाची साथ आली त्यावेळी मी व आमदार कैलास पाटील, नंदु राजेनिंबाळकर यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी सामाजिक बांधीलकी समजून प्रत्येकाने आपआपल्या परीने योगदान दिले. आज उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदावर असताना जिल्हयासाठी महत्वाचे पुर्ण शासकीय मेडीकल कॉलेज मंजुर केले. तसेच 7 टीएमसी पाण्यासाठी देखील भरीव तरतुद केली. उध्दव ठाकरे यांनी कोरोना काळात महाराष्ट्रासाठी दिलेले योगदान महाराष्ट्रातील जनता कधीही विसरणार नाही व अशा मानसाला पक्षातीलच स्वार्थी मंडळींनी व राजकीय लालसेपोटी याप्रकारे पदावरुन घालवले.
.यावेळी आमदार कैलास पाटील, सहसंपर्कप्रमुख शंकरराव बोरकर, सहसंपर्कप्रमुख नंदु राजेनिंबाळकर, राज्य विस्तारक अक्षय ढोबळे, सतीश सोमानी, सोमनाथ गुरव, विजय सस्ते, मनिषा वाघमारे, शाम जाधव, आमीर शेख, गणेश खोचरे,बाळासाहेब काकडे, राजाभाऊ पवार, मोईन पठाण, आफरोज फिरजादे, पंकज पाटील, अभिजीत देशमुख, सौदागर जगताप, मुकेश पाटील, सुमीत बागल, संजय खडके, आमोल मुळे, व्यंकट गुंड, आण्णा पवार आदीसह शिवसैनिक, पत्रकार व महिला आघाडी या पदाधिकारी उपस्थीत होत्या.
2004 साली मोदी होते का?
यावेळी बोलताना खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी भाजपवर घणाघाती टीका करत नरेंद्र मोदी यांच्या लाटेमुळे खासदार झालो असे काही लोक म्हणतात. यापुर्वी सन 2004 साली कल्पनाताई नरहिरे व त्यांच्या पुर्वी शिवाजी बापु कांबळे हे हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करणाऱ्या शिवसैनिक व मतदारामुळे खासदार झाल्या होत्या. त्यावेळी नरेंद्र मोदीची लाट होती का ? असा प्रश्न राजेनिंबाळकर यांनी उपस्थित केला.