धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्हा पत्रकार संघ आणि पल्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीदिनी शनिवारी (दि.6) पल्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबिरात पत्रकार तसेच वृत्तपत्र विक्रेते आणि त्यांच्या कुटुंबातील तब्बल 177 जणांची तपासणी करण्यात आली.

तत्पूर्वी शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रसेन देशमुख, पल्स हॉस्पीटलचे संचालक डॉ. तानाजी लाकाळ, ज्येष्ठ पत्रकार अनंत आडसुळ, कमलाकर कुलकर्णी, डॉ. रणजीत कदम, डॉ. वीरेंद्र गवळी, डॉ. विकास बाराते, डॉ. बालाजी लोमटे, डॉ. पवन महाजन आदींची उपस्थिती होती. सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत घेण्यात आलेल्या शिबिरामध्ये रक्तदाब, थायरॉईड, शुगर लेवल, ईसीजे, हिमोग्लोबिन, हाडांची तपासणी, पोटाचे विकार, डोळे आदी आजाराबाबत 177 जणांची तपासणी करण्यात आली. या शिबिरात तज्ञ डॉक्टर म्हणून डॉ. तानाजी लाकाळ, डॉ. रणजीत कदम, डॉ. वीरेंद्र गवळी, डॉ. बालाजी लोमटे, डॉ. विकास बाराते, डॉ. नितीन भोसले, डॉ. पवन महाजन यांनी तपासणी केली.

यावेळी पत्रकार संघाचे संघटक महेश पोतदार, सरचिटणीस भीमाशंकर वाघमारे, पदाधिकारी रवी केसकर, चेतन धनुरे, बाबुराव चव्हाण, देवीदास पाठक, दिलीप पाठक-नारीकर, बालाजी निरफळ, सयाजी शेळके, तानाजी जाधवर, जी. बी.राजपूत, मच्छिंद्र कदम, आरिफ शेख, सुधीर पवार, प्रशांत कावरे, बाळासाहेब मुंदडा, शितलकुमार धोंगडे, अझर शेख, राकेश कुलकर्णी, प्रवीण पवार, विनोद बाकले, सुरज पाचपिंडे, किशोर माळी, अजित माळी,  काकासाहेब कांबळे, संतोष शेटे, बाळासाहेब माने, प्रा. अभिमान हंगरकर, अमोल गाडे, शीतल वाघमारे, सलीम पठाण, आकाश नरुटे, विकास सूर्डी, संतोष जोशी, भाउसोब अणदूरकर, रियाज शेख, पांडूरंग मते, संजय शिंदे, शिवराज गव्हाणे, उमाजी गायकवाड, उमाकांत भुसारे, शाहरुख सय्यद, राजवर्धन भुसारे, इस्माईल सय्यद यांच्यासह जिल्हाभरातून पत्रकार संघाचे पदाधिकारी, सदस्या यांची उपस्थिती होती.


जिल्हाधिकाऱ्यांकडून पत्रकार संघाचे कौतुक

 यावेळी प्रास्ताविकात अध्यक्ष चंद्रसेन देशमुख यांनी पत्रकार संघाच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेतला. तसेच पुढील काळातील केल्या जाणाया कार्याची माहिती दिली. त्यानंतर मार्गदर्शक अनंत अडसूळ यांनी मनोगत व्यक्त केले. पत्रकार संघाच्या कार्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी कौतुक केले. ते म्हणाले, पत्रकारांनी ताणतणावाच्या या काळात आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज असून, अशा आरोग्य शिबिरातून आरोग्याची काळजी घेण्याचे काम केले जात आहे, हे अत्यावश्यक आहे. पत्रकारांनी धावपळीच्या जीवनात सामाजिक, शारीरिक आरोग्यासोबतच आर्थिक आरोग्य देखील जपणं गरजेचं आहे, असे सांगितले.


जिल्हा पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्ष कार्यकारणी जाहीर

या कार्यक्रमात पत्रकार संघाची जिल्ह्यातील तालुकाध्यक्षांची जिल्हाध्यक्षांच्या परवानगीने नियुक्ती करुन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यामध्ये धाराशिव तालुकाध्यक्ष मच्छिंद्र कदम, उमरगा तालुकाध्यक्ष अविनाश काळे, लोहारा तालुकाध्यक्ष बालाजी बिराजदार, तुळजापूर तालुकाध्यक्ष प्रदीप अमृतराव, कळंब तालुकाध्यक्ष पदसिद्ध-अशोक शिंदे, भूम तालुकाध्यक्ष प्रल्हाद अडागळे, परंडा तालुकाध्यक्ष आंनद खर्डेकर यांच्या निवडी करुन नियुक्तीपत्र देण्यात आले.


पुढील वर्षीही पत्रकारांची आरोग्य तपासणी होणार

या कार्यक्रमात पल्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलचे संचालक डॉ. तानाजी लाकाळ यांनी पत्रकार व त्यांच्या कुटूंबासाठी पुढील वर्षीही असे शिबीर घेवून तपासणी करण्यात येईल, अशी घोषणा केली. त्यामुळे पुढील वर्षीही पत्रकारांसह त्यांच्या कुटूंबातील सदस्यांची तपासणी होणार आहे.



 
Top