धाराशिव (प्रतिनिधी)- चांदणी विद्यालय, आसू ता.परांडा जि.धाराशिव येथील कलाध्यापक दत्तात्रय खंडागळे यांनी शालेय, सामाजिक व कला क्षेत्रात केलेल्या कामाची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ पुणे तर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श कलाध्यापक पुरस्कार दि . 19 . 1. 2024रोजी बोर्डी,ता. डहाणू जि.पालघर येथील 4 2 वी कलाशिक्षण परिषदेत प्रदान करण्यात आला.यावेळी धाराशिव जिल्हा कलाध्यापक संघ,जिल्हा कार्याध्यक्ष शिवाजी भोसले, जिल्हाध्यक्ष नानासाहेब बोराडे, जिल्हा सचिव शेषनाथ वाघ, कलाध्यापक शैलेश कुलकर्णी, अनिल रॉय, अश्विनी जाधव आदी कलाध्यापक उपस्थित होते .कलाध्यापक खंडागळे यांचे यानिमित्त सर्वत्र कौतुक होत आहे.