परंडा (प्रतिनिधी) - येथील जिल्हा परिषद प्रशाला येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून बुधवार दि. 3 जानेवारी रोजी आनंद बाजार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला

या मेळाव्याची सुरुवात परंडा येथील तहसीलदार घनश्याम आडसूळ साहेब व पोलीस निरीक्षक इज्जापवार यांच्या हस्ते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. जिल्हा परिषद प्रशाला जिल्हा परिषद कन्या प्रशाला उर्दू प्राथमिक शाळा उर्दू माध्यमिक शाळा येथील एकूण 110 विद्यार्थी यांनी विविध पाककृती तयार करून मांडल्या होत्या.

वडापाव, वडे भजी, समोसे असे विविध पदार्थ स्टॉल वर मांडले होते. शहरातील नागरिक व पालक यांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी अशोक खुळे, सूर्यभान हाके.मुख्याध्यापक रामचंद्र इंगळे, दिनकर पवार, अहमद खतीब, यास्मीन सय्यद, आलमगीर सय्यद, सतीश खरात, आबासाहेब माळी, शशिकांत माने, भाऊसाहेब सुर्यवंशी, तानाजी मिसाळ, शुभांगी देशमुख, मिनाक्षी मुंडे, जमील बांगी, मुस्तफा शेख, समिना दखनी, रूक्साना विजापूरे, शबाना काझी, यास्मीन पंजेशा, महेंद्र शिंदे, नारायण शिंदे, नामदेव पखाले, चंद्रकांत सुरवसे, गीता मंडलिक  रेखा उसराटे आदी पालक व शिक्षक उपस्थित  होते. याप्रसंगी शिक्षक शशिकांत माने यांनी त्यांच्या वाढदिवसाचे निमित्ताने परिसरातील शाळांना कचरा कुंडी वाटप केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक रामचंद्र इंगळे यांनी केले. सूत्रसंचालन तानाजी मिसाळ यांनी केले. आभार प्रदर्शन भाऊसाहेब सूर्यवंशी यांनी मानले. या कार्यक्रमाचे नियोजन शशिकांत माने यांनी केले.


 
Top