धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेच्या वतीने दि 21 ते 22 जानेवारी 2024 दरम्यान श्री तुळजाभवानी स्टेडियम धाराशिव येथे आयोजित जिल्हास्तर सब ज्युनिअर ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा व निवड चाचणी स्पर्धेचे भैरवनाथ नाईकवाडी तालुका क्रीडा अधिकारी यांच्या हस्ते थाटात उद्घाटन झाले. यावेळी स्पर्धा प्रमुख व कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेश बिलकुले, जिल्हा ॲथलेटिक संघटनेचे सचिव योगेश थोरबोले, संचालक सचिन पाटील, पवन वाठवडे, लक्ष्मीकांत पुजारी, अजिंक्य वराळे, राहुल जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
जिल्हास्तर सब- ज्युनिअर ॲथलेटिक स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळेतील 300 ते 400 खेळाडूंनी सहभाग नोंदवला स्पर्धेचे उद्घाटक नाईकवाडी यांच्या मनोगत त्यांनी आरोग्याचे महत्त्व व जीवनातील खेळाविषयी चे महत्व अधोरेखित केले,तसेच लहान खेळाडूंना एक स्थान निर्माण करून दिल्याबद्दल ऍथलेटिकस संघटनेचे कौतुक केले व क्रीडा अधिकारी कार्यलय कडून सर्वतोपरी मदत करू असे आश्वासन दिले. यावेळी या स्पर्धेचे पंच म्हणून रोहित सुरवसे, योगिनी साळुंके सुहास कांदे हे काम पाहत आहेत.