धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील  एस.बी. एजन्सीज येथे 6  अनिवार्य कार्यक्रम पैकी जिल्हा धाराशिव जिल्हा संस्कार भारती समितीच्या वतीने भारत माता पूजन करण्यात आले. संस्कार भारतीचे ध्येयगीत गायन करून देशभक्ती गीतांचे गायन करण्यात आले या प्रसंगी संस्कार भारती देवगिरी प्रांत चित्रकला विधा प्रमुख व जिल्हा मार्गदर्शक शेषनाथ केशरबाई दगडोबा वाघ, जिल्हा कार्याध्यक्ष अनील ढगे, जिल्हाध्यक्ष श्यामसुंदर भन्साळी, जिल्हासंगीतविधा प्रमुख सुरेश वाघमारे सुंभेकर, सदस्य शिवाजी भोसले, सत्यहरी वाघ, सेवानिवृत्त सबरजिस्टार उत्तम सरफाळे, रवी चौबे, नामदेव मसे, गवळी उपस्थित होते. पेढे वाटून प्रजासत्ताकदिनाचा आनंद साजरा करण्यात आला.


 
Top