धाराशिव (प्रतिनिधी)-स्त्रियांसाठी साक्षरतेची वाट प्रकाशमान करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची 193 वी जयंती बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) जिल्हा कार्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. पक्ष कार्यालयात जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच महात्मा फुले चौक, धाराशिव येथे सावित्रीबाईंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांच्यासह अल्पसंख्याक माजी जिल्हाध्यक्ष असद खान पठाण, माजी सैनिक विभाग जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र क्षीरसागर, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष अतुल जगताप, सेवा दल विभाग जिल्हाध्यक्ष सतीश घोडेराव, अरफात काझी आदीसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.