भूम (प्रतिनिधी)- पोलिसांच्या सतर्कतेमुळे एसटीमध्ये गहाळ झालेले बारा लाखाचे 20 तोळे सोने सीसीटीव्हीच्या माध्यमातून व पोलिसांच्या शतकतेमुळे परत मिळाले. 

अधिक माहिती अशी की, आंबी या ठिकाणाहून स्नेहप्रभा पाटील या पुणे ते भूम एस टी.बस ने भूम या ठिकाणी बस ने येत असताना त्या भूम शहरात प्रवेश करण्याअगोदर जिजाऊ चौक या ठिकाणी उतरल्या. परंतु उतरत असताना त्यांच्याकडे जी दागिन्याची बॅग होती ती अनावधानाने बस मध्येच विसरली.  पुन्हा परत येऊन त्यांनी शोध घेतला असता ती बॅग त्या बस मध्ये मिळाली नाही. त्यांनी ताबडतोब पोलीस स्टेशन भूम या ठिकाणी धाव घेतली. भूम पोलीस स्टेशनचे बीट अंमलदार क्षीरसागर यांना ताबडतोब बस स्टॅन्ड ला पाठवून त्या ठिकाणी सी.सी.टी व्ही.फुटेज चेक करण्याच्या सूचना दिल्या. 

सीसीटीव्ही फुटेज मध्ये चेक केले असता त्यांना एक महिला सदर वर्णनाची बॅग घेऊन जात असताना दिसली. त्यानंतर ते सीसीटी व्ही फुटेज ग्रुप वर टाकल्यानंतर बंदोबस्तातील कर्मचारी यांनी त्या महिलेचा शोध घेतला व शोध घेऊन तो मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आणि तो मुद्देमाल सन्मानाने श्रीमती स्नेहप्रभा पाटील यांना देण्यात आला. त्या बॅगमध्ये वीस तोळे सोनं म्हणजे जवळपास 12 लाख रुपये किमतीचे होते. त्यांनी पोलिसांचे आभार व्यक्त केले. यावेळी पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी उपनिरीक्षक कुणाल सूर्यवंशी, शशिकांत तावर, संदेश शिरसागर, उमेश देवकर, अजित मोरे,अमित पाटील, संग्राम शिंदे, विशाल शिंदे, विशाल शिंदे यावेळी उपस्थित होते.


 
Top