भूम (प्रतिनिधी)-वारकरी संप्रदाय व भजनी मंडळातील सदस्यासाठी आयोजित आयुष्यमान भव्य आरोग्य शिबिरामध्ये 11295 वारकरी संप्रदायातील वारकऱ्यांनी सहभाग घेऊन आरोग्य तपासणी करून घेतली.

भूम तालुक्यामधील सामनगाव येथे पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून आरोग्य विभागाच्या वतीने आयुष्यमान भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात वारकरी संप्रदाय व भजनी मंडळातील सदस्यासाठी सामनगाव येथे प्रतिबंधात्मक व उपचारात्मक सर्व रोगासाठी सामनगाव येथील सद्गुरू शामनाथ महाराज देवस्थान तीर्थक्षेत्र जुने येथे करण्यात आले. या शहराला तिन्ही तालुक्यातील वारकरी संप्रदायातील वारकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद देत आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली. या शिबिरामध्ये स्त्रीरोग, हृदयरोग, नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप, रक्तदाब, मधुमेह तपासणी आयुष्यमान कार्ड वाटप ,आभा कार्ड वाटप, कॅन्सर तपासणी, सोनोग्राफी, एक्स-रे, आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथिक इत्यादी आजाराची तपासणी व  मोफत औषधोपचार करण्यात आले .

शिबिरात प्रामुख्याने भूम परंडा वाशी तालुक्यातील बहुतांशी वारकरी संप्रदायाचे व भजनी मंडळाचे सदस्यांनी हजेरी लावली या शिबिरात सर्वांची आरोग्य तपासणी व भोजनाची व्यवस्था करण्यात आली असताना आरोग्य तपासणी पूर्ण झाल्यानंतर ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे किर्तन हे सर्वांसाठी आयोजन करण्यात आले होते.

शिबिर यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत,  संजय गाढवे, रामदास महाराज सामनगावकर, धर्मराज महाराज सामनगावकर, रवी महाराज सामनगावकर, दत्ता मोहिते, गौतम लटके, बालाजी गुंजाळ, अण्णा जाधव, सत्यवान गपाट, उद्धव साळवी, नागनाथ नाईकवाडी, अर्चनाताई दराडे, राहुल डोके आदी मान्यवर उपस्थित होते.


 
Top