भूम (प्रतिनिधी)- भूम - परांडा - वाशी तालुक्यात सुरू असलेल्या मोफत आरोग्य सेवा हीच माझ्यासाठी प्रेरणा आहे. याचे फलित मला नागरी सत्काराच्या माध्यमातून मिळत आहे. महावितरण शेतकऱ्यांना डीपी दुरुस्तीच्या माध्यमातून झटका देत असले तरीही मी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहे. रोहित्राची (डीपी) दुरुस्ती असल्यास शेतकऱ्यांनी फक्त फोन करायचा आहे माझी टीम शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन ने आन करण्याची मोफत सेवा करेल. अशी ग्वाही डॉ. राहुल घुले यांनी दिली.
गावोगावी फिरत असताना असे लक्षात आले की, डीपी खराब झाल्यानंतर बांधावरून एमएसईबी कार्यालयापर्यंत डीपीची वाहतूक करतांना शेतकऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. डीपी वाहतुकीची सोय करण्याची मागणी मला अनेक शेतकऱ्यांनी केली असता मी शेतीच्या बांधापासून ते एमएसईबी कार्यालय पर्यंत ने-आण करण्यासाठी मोफत डीपी वाहतुकीची सोय उपलब्ध करून देत आहे. असे शेतकऱ्यांना प्रेरणा देणारे ऐतिहासिक वक्तव्य डॉ. राहुल घुले यांनी आरसोली येथील आयोजित भव्य नागरी सत्कारा दरम्यान शेतकऱ्यांशी बोलताना केला. संघर्ष हा शेतकऱ्यांच्या पाचवीला पुजलेला असून यातच निसर्गही शेतकऱ्यांना त्रास देण्यात काडीमात्र संधी सोडत नाही. आलेल्या पिकांना पाणी देण्याच्या मोसमालाच डीपीची नादुरुस्ती आपणास पहावयास मिळते. डीपी ने-आन करण्यासाठी शेतकरी हा मेटाकूटीला येत असून यातच पिके माना टाकून देण्याची भीती असते. वेळेवर पिकांना पाणी न मिळाल्यामुळे उत्पन्न घट होत. हीच शेतकऱ्यांची अडचण डॉ. राहुल घुले यांनी समजून घेऊन शेतकऱ्यांना मोफत डीपी वाहतूक करण्यासाठी गाडीची व्यवस्था केलेली आहे.