तुळजापूर (प्रतिनिधी)-शहरातील लातुर असणाऱ्या रस्त्यावर कृषीविज्ञान केंद्रातील नऊ शेळ्या दोन बोकड किंमत 1 लाख 95 हजार रुपये किमतीचे पशुधन सोमवार दि.1 जानेवारी रोजी पहाटे नववर्षाचा प्रथम दिनी चोरुन नेल्याची घटना घडली. घरफोडी, दुचाकी नंतर चोरट्यांनी आपला मोर्चा शेतकऱ्यांच्या पशु जनावरे कडे वळवल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांच्या मुसक्या कधी अवळणार असा प्रश्न शेतकऱ्यांमधुन विचारला जात आहे. 

या बाबतीत अधिक माहीती अशी की, डॉ विजयकुमार श्रावण जाधव, रा. कृषीविज्ञान केंद्र लातुर रोड तुळजापूर जि. धाराशिव यांचे पशुविज्ञान केंद्र तुळजापूर शिवारातील शेळीपालन गोडाउनचे कुलूप अज्ञात व्यक्तीने सोमवार दि.1 जानेवारी रोजी 2 ते 5 वा.सुमारास गोडावुन चे कुलुप तोडून गोडाउन मधील 9 शेळ्या व 2 बोकड असे एकुण 1 लाख 95 हजार रूपये किंमतीचे पशुधन चोरुन नेले. या चोरी प्रकरणी तुळजापूर पो. ठाणे येथे कलम 461,380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे


 
Top