नळदुर्ग (प्रतिनिधी)- ठाकुर परिवाराने केलेल्या सत्काराने मी भारावुन गेलो असुन या सत्काराने मला माझ्या आईच्या मायेची आठवण करून दिले असल्याचे नळदुर्ग शहर सर्व शाखीय ब्राम्हण समाज संघटनेचे अध्यक्ष विनायक अहंकारी यांनी म्हटले आहे.

नळदुर्ग शहर सर्व शाखीय ब्राम्हण समाज संघटनेच्या अध्यक्षपदी नुकतेच माजी नगरसेवक विनायक अहंकारी यांची निवड झाली आहे. त्यांच्या निवडीचे सर्वांनीच स्वागत केले आहे. दि.10 डिसेंबर रोजी नळदुर्ग येथील बलदेवसिंग ठाकुर यांनी आपल्या निवासस्थानी नळदुर्ग शहर सर्व शाखीय ब्राम्हण समाज संघटनेचे अध्यक्ष विनायक अहंकारी यांचा सत्कार केला आहे. बलदेवसिंग ठाकुर हे पोलिस दलात कार्यरत आहेत. बलदेवसिंग ठाकुर यांनी त्यांच्या आईच्या हस्ते केलेल्या सत्काराने मी भारावुन गेलो असुन या सत्काराचे ऋण मी कधीच फेडु शकणार नाही. या सत्काराने मला माझ्या आईच्या मायेची आठवण झाली असल्याचेही विनायक अहंकारी यांनी म्हटले आहे.


 
Top