धाराशिव (प्रतिनिधी) - दि.31 डिसेंबर शहरातील समता नगरातील सेवा भवन येथे महाराष्ट्र राज्य कलाध्यापक महामंडळ संघ, पुणे संलग्न शाखा धाराशिव जिल्हा कलाध्यापक संघाची बैठक संपन्न झाली प्रथम सरस्वती प्रतिमा पुजननानंतर कलाध्यापक किरण वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीस सुरुवात होऊन पुढील प्रमाणे विषयास मान्यता घेण्यात आली.

 पालघर येथे 42 वी  कलाशिक्षण परिषदेस जास्तीत-जास्त कलाध्यापकांनी उपस्थित राहावे, कलाध्यापकांना ए. एम. वेतनश्रेणी मिळणेबाबत मा. उपसंचालक कार्यालयात पाठपुरावा करणे, सूचक कलाध्यापक गणेश पांचाळ होते. 'कलाभवन' धाराशिव शहरात व्हावे याकरिता कला ध्यापक संघाचे निवेदन व पाठपुरावा करणे. सुचक - जेष्ठ कलाध्यापक डी.जी. करंजकर होते. कलाध्यापकांची धाराशिव जिल्हाभर सदस्य नोंदणी करणे. सदस्य वर्गणी 100 रु. आकारणे, नुतन जिल्हाकारिणी, कलाधापक संघाची पालघर कलाशिक्षण परिषदेनंतर  गठीत करुन राज्य कलाध्यापक महामंडळ संघाची मान्यता घेणे. 'कलानिदेशक' बांधवाकरिता राज्य कार्यकारिणीस निवेदन देणे. सुचक रवी तिगाडे होते. वरील सर्व बैठकीतील विषय उपस्थित कलाध्यापकांनी सर्वांनुमते मंजूरी देण्यात आली. या बैठकीस जिल्हाध्यक्ष नानासाहेब बोराडे, जिल्हा कार्याध्यक्ष शिवाजी भोसले, जिल्हासचिव शेषनाथ वाघ, जिल्हा उपाध्यक्ष  किरण वाघमारे,  सहसचिव  साहेबराव गांगुर्डे, कलाध्यापक अभिनंदन आकाडे, कलनिदेशक रवी तिगाडे उपस्थित होते. खेळमेळीत बैठक संपन्न झाली.


 
Top