तुळजापूर (प्रतिनिधी)-  मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे  पाटील यांनी आपले आंदोलन पुढे ढकलल्याने शहरवासियांन सह भाविकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. मराठा आरक्षण आंदोलन व नाताळ सुट्या ऐकाच कालावधीत आल्याने या काळात तणाव वातावरण वाढण्याची शक्यता असल्याने यामुळे  आपले नुकसान होणार या चिंतेने तुळजापूरकर धास्तावुन गेलं आहेत. या बीड सभेत मनोज जरांगे पाटील आंदोलन बाबतीत काय भाष्य करणार याची उत्सुकता शहरवासियांना लागली होती. माञ मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे यांनी बीड येथील जाहीर सभेत आंदोलन नव्या वर्षात 20 जानेवारी 2024 पासुन करणार असल्याची घोषणा केल्याने तुळजापूरकरांनी सुटकेचा श्वास घेतला.

नाताळ सुट्यांच्या पार्श्वभूमीवर श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ शहरीभागातील खास करुन मुंबई येथील भाविक मोठ्या संख्येने देवीदर्शनार्थ येतात. नाताळ 25 डिसेंबरला सुरु होणार असून, याच दरम्यान मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे हे मराठा समाजास ओबीसीत आरक्षण मिळावे म्हणून मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईकडे कुच करणार असल्याने ते मुंबईत पोहचल्यावर मुंबईसह महाराष्ट्रात काय घडणार या चिंतेने ञस्त झाले. या काळात शहरी भागातील भाविक तिर्थक्षेञी तुळजापूरला येणार कि नाही याची चिंता येथील व्यवसायीकांना लागली आहे. आंदोलन धग वाढली तर हे भाविक येण्याची शक्यता कमी असल्याने याचा व्यवसायावर परिणाम होवुन तुळजापूरकरांना याचा अर्थिक रुपाने फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे या आंदोलनाची धास्ती तुळजापूरकरांना लागली आहे.  माञ मराठा आरक्षण आंदोलनच पुढे ढकलल्याने  तुळजापूरकरांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. नाताळ सुट्यांच्या पार्श्वभूमीवर आपआपल्या व्यवसायाकडे वळले आहे. 


पोलिसांनी ही घेतला सुटकेचा श्वास!     

मराठा आरक्षण आंदोलन पार्श्वभूमीवर पोलिस खात्याने  बैठका सपाटा लावला होता व आंदोलन पार्श्वभूमीवर पोलिसांच्या सुट्याही रद्द केल्या होत्या माञ आंदोलन पुढे जाताच पोलिसांनी सुटकेचा श्वास घेतला. भाविक वर्ग, स्थानिक पुजारी वृंदाकडे वातावरणा बाबतीत विचारणा करीत होती. माञ त्यांनी ही आंदोलन पुढे ढकलल्याने सुटकेचा श्वास घेतला.


 
Top