धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव तालुक्यातील सारोळा केंद्र अंतर्गत दहा शाळेना विद्यार्थी व शिक्षकांना प्रेरणादायी पुस्तके युनिक फिचर्स व समकालीन प्रकाशन संस्थे च्या माद्यमातून देणगीदाराच्या मदतीने प्रत्येक शाळेस सहा हजार किमतीची पुस्तके मोफत वाटप करण्यात आली. 

देणगीदार श्रीमती पुष्पा बाक्रे पुणे, मेघा पंडित पुणे, अमित अभ्यान्कर ठाणे, संघमित्र रानवडे मुंबई, नीला पावसकर पुणे, मेघा पंडित पुणे, विभा करमरकर पुणे, रोहिणी तुकदेव सांगली, अमित अभ्यंकर पुणे, संघमित्र रानावडे मुंबई या देणगीदारांनी युनिक फिचरच्या माध्यमातून प्रत्येक शाळेला सहा हजार रुपयांची अत्यंत दर्जेदार व प्रेरणादायी पुस्तके दिली. सदर पुस्तकाचे वाटप जिल्हा परिषद प्रथमिक शाळा राजुरी या शाळेत दि. 27 डिसेंबर रोजी शिक्षण विस्तार अधिकारी नवनाथ आदटराव, केंद्रप्रमुख राजेंद्र गिरी, युनिक फिचर्सचे समन्व्यक बशीर तांबोळी, शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बीबीषण पाटील, मुख्याध्यापक साहेबराव जगदाळे यांच्या हस्ते वाटप करण्यात आली. यावेळी संबंधित शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. सदर पुस्तकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती वाढवावी व सक्षम विद्यार्थी निर्माण करावे. भावी आदर्श नागरिक तयार करावे असे आवाहन विस्तार अधिकारी नवनाथ आदटराव  व केंद्र प्रमुख राजेंद्र गिरी यांनी केले. कार्यक्रमचे प्रास्ताविक समन्व्यक बशीर तांबोळी यांनी केले. सूत्रसंचालन बनकर व आभार बिभिषण पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून संतोष डोके, नितीन घुटे जाधव, जावळे, इसाके, मन्सूळे यांनी प्रयत्न केले. 
Top