तुळजापूर (प्रतिनिधी)- नाताळ सुट्यांच्या पार्श्वभूमीवर होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाने दि. 25 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत श्रीतुळजाभवानी मंदिर पहाटे एक वाजता चरणतिर्थ होवुन दर्शनार्थ खुले करण्याचा निर्णय हा घेतला. यामुळे भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण येवुन भाविकांना कमी वेळात दर्शन घडणार आहे. माञ रांगेतुन आलेल्या भाविकांना सुलभ दर्शन घडविण्यासाठी प्रशासनाने योग्यती उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे.

नाताळ सुट्टी निमित्त होणारी गर्दी पाहता सोमवार दि. 25 डिसेंबर 2023 रोजीचे चरणतीर्थ पहाटे 1 वाजता होईल. तसेच दिनांक 27 डिसेंबर 2023 पासून दि. 31 डिसेंबर 2023 पर्यंत येणारे मंगळवार, शुक्रवार, रविवार व पौर्णिमा या दिवशी भाविकांचे दर्शन सुलभ व्हावे म्हणून सकाळचे चरणतिर्थ पहाटे 1.00 वाजता होईल. पुजेची घाट सकाळी 06.00 वा होईल. तसेच अभिषेक सकाळी 06.00 ते 10.00 व सायंकाळी 07.00 ते 09.00 वाजता या वेळेत संपन्न होतील. तसेच अभिषेक कालावधीत देणगी दर्शन बंद राहील याची सर्वांनी नोंद घ्यावी. असे आवाहन मंदीर प्रशासनाने केले आहे.

पोर्णिमा मंगळवार दि.26 डिसेबर रोजी श्री तुळजाभवानी मंदिराची पोर्णिम आहे. या पार्श्वभूमीवर  सोमवार दि. 25 डिसेंबर रोजी रात्रौ छबिना. मंगळवार  दि. 26 डिसेंबर रोजी रात्री छबिना व जोगवा. बुधवार दि. 27 डिसेंबर रोजी रात्रौ छबिना काढला जाणार आहे.


 
Top