धाराशिव (प्रतिनिधी)- भीमनगर धाराशिव येथील ज्येष्ठ नागरिक मोहरबाई गजेंद्र माळाळे (वय 89) यांचे आज सकाळी सव्वा बाराच्या सुमारास वृद्धापकाळ व दीर्घ आजाराने पुण्यात खाजगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, दोन मुली, नऊ नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.
महावितरण मधील सेवानिवृत्त कर्मचारी , सामाजिक कार्यकर्ते ॲड. सुदेश माळाळे व पुणे येथील सहकारनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांच्या त्या आई आहेत. त्यांनी आपल्या मुलांना व समाजातील अनेकांना समाजसेवेची प्रेरणा दिली. त्यांच्यावर धाराशिव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.