धाराशिव (प्रतिनिधी)-आजी व वडील गेल्या दहा पधंरा दिवसापासून दवाखान्यात गेलेत तर घरात 80 वर्षाचे वयोवृद्ध आजोबा व काही काही महिन्यापूर्वी आईला अर्धागवायूचा झटका  आल्याने  स्वताचे काम करणेही अवघड  अशा परस्थीतीत घरात खाण्यासाठी अन्नाचा कण नाही. आजी व वडिलानी फाशी घेवून आत्महत्याकेलेला निरोप आला तेव्हा तिसरीत शिकणारी ईश्वरी धान्यातील सोयाबीन उपटण्यासाठी कामाला गेलीली. शेतातून तिला कोणतरी मोटार सायकल व घरी सोडले. ती आली व आई च्या गळ्यात पडुन टाहो फोडला. आणी उपस्थिताचे मन हेलावले. मायलेकराने फाशी  घेतल्याने परिवाराला मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.

येथील सुमन बंजरग सुतार व बापु उर्फ सागर बजरंग सुतार यांनी तुळजापूर तालुक्यातील सांगवी जवळ  आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली.त्यांच्या पश्चात पत्नी,वडील,एक मुलगी,दोन लहान मुले आहेत. मयत बापुच्या पत्नीस बालीका हिला गेल्या वर्षी अर्धागवायूचा झटका आला होता. तर तर बापु हॉटेलात काम करत होता. परंतू त्याला दारूचे व्यसन लागले व तो व्यसनाने कर्जबाजारी झालेला होता. त्याने कर्जबाजारीपणा कंटाळून आईला घेवून दहा दिवसापूर्वी गेला होता. आई व मुलाने आत्महत्या केली. तेथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला. काही वेळातच आलेली गर्दी परत गेली आणी इश्वरीचा संघर्ष सुरु झाला. ति तिच्या लहान भांवडाचा सांभाळ करु लागली आणि जिवनाचा संघर्ष सुरू झाला.

आशा कार्यकर्ती व समाज सेवीका सीमा कदम यांनी या कुटुंबाला या दानशूर व्यक्ती कडुन यापूर्वी ही मदत मिळवून दिली असून हे कुटूब सध्या उघडे पडले असून दानशुर व्यक्तीशी यांना मदत करावी असे आवाहन सीमा कदम 9921013581 यांच्याशी या नंबरवर संपर्क साधावा.


 
Top