धाराशिव (प्रतिनिधी)-शहरातील संताजी जगनाडे महाराज चौक येथे राष्ट्रसंत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या 399 व्या जयंती निमित्त प्रतिमेचे पुजन धाराशिव जिल्हयाचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंम्बासे यांच्या हस्ते जन्मोत्सव साजरा करून अभिवादन करण्यात आले.  नवीन पिढीला चांगल्या संस्काराची गरज आहे. संताजींचे विचार, त्यांची पुस्तके वाचण्यासाठी आवड निर्माण केली पाहिजे. यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंम्बासे यांनी केले.

याप्रसंगी तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर,जनता बँकेचे माजी चेअरमन विश्वास आप्पा शिंदे, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ घोडके,दत्ता बंडगर,जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संजय देशमुख, भारत डोलारे, पत्रकार संतोष हंबीरे, जिल्हा सचिव अँड. विशाल साखरे, जिल्हा कोषाध्यक्ष महादेव मेंगले, हभप.मुकुंद महाराज कोरे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.

याप्रसंगी नगरसेवक युवराज नळे,नितीन शेरखाने. महादेव माळी, खलिल सय्यद,मैनोद्दिन पठाण,सिध्दार्थ बनसोडे, अँड खंडेराव चौरे, नाभिक समाजाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण माने, प्रविण कोकाटे, नितिन शेरखाने, प्राचार्य डॉ. अनिल देशमाने, शिवानंद कथले, सतिश कदम, पांडुरंग लाटे, मुकेश नायगावकर, धनंजय राऊत, सुनिल शेरखाने, महादेव माळी, प्रमोद मेंगले, नागेश निर्मळे यांच्यासह सर्व समाजातील प्रतिनिधी व समाज बांधव यांची उपस्थिती होती.



 
Top