धाराशिव (प्रतिनिधी)- शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी भाजपा व भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने स्वातंत्र्यवादी सावरकर यांच्या बद्दल कर्नाटक काँग्रेसचे मंत्री प्रियंका मल्लिकार्जुन खर्गे यानी केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ मल्लिकार्जुन खर्गे व प्रियंक खर्गे यांचा प्रतिकात्मक पुतळयाला जोडे मारून जाळण्यात आले.
कर्नाटकचे कॉग्रेसचे मंत्री प्रियंक खर्गे हे हिंदु द्वेषा पोटी सावरकर यांच्या विरोधात सातत्याने चुकीचे व निषेधार्थी वक्तव्य करतात. सातत्याने होत असलेल्या टिकेमुळे भाजपा युवा मोर्चा धाराशिव यांच्या वतीने त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारुन दहन करण्यात आले. महाराष्ट्रातील उध्दव बाळासाहेब ठाकरे, आदित्य ठाकरे हे मूग गिळून गप्प का आहेत? यापुढे आमच्या कोणत्यांही श्रध्दा स्थानाविषयी टिका- टिपणी केली तर भारतीय जनता युवा मोर्चा त्यांना रस्त्यावर फिरु देणार नाही.
हे आंदोलन भाजपा माजी अध्यक्ष नितीन काळे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर यांच्या नेतृत्वात करण्यात आले. यावेळी युवराज नळे, सुनिल काकडे, अभय इंगळे, अभिजीत काकडे, पंडीत मंजुळे, दुर्गाप्पा पवार, रमण जाधव, अमोल राजेनिंबाळकर, सचिन लोंढे, दत्ता पेठे, स्वप्नील नाईकवाडी, अमित कदम, प्रसाद मुंडे, गणेश एडके, धनराज नवले, नवनाथ सोलंनकर, सार्थक पाटील, गणेश मोरे, नरेन वाघमारे, किशोर पवार, राजकुमार भाऊ पवार आदीसह भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते,पदाधिकारी आंदोलनावेळी उपस्थित होते.