धाराशिव (प्रतिनिधी)-15 सप्टेंबर 2023 रोजी राज्य सरकारचे उपसचिव संतोष गावडे यांनी काढलेल्या परिपत्रकानुसार मा. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ औरंगाबादचे प्रभारी रजिस्टार पी. बी. घुगे यांनी जिल्हा सत्र न्यायालय उस्मानाबादचे नामांतर राज्य सरकारने काढलेल्या 15 सप्टेंबर 2023 च्या परिपत्रकानुसार जिल्हा सत्र न्यायालय धाराशिव असे नामांतर करण्याचे परिपत्रक काढले आहे. 

दि. 15 सप्टेंबर 2023 रोजी राज्य सरकारच्या परिपत्रकानंतर 17 सप्टेंबर रोजी संभाजीनगर येथे झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत प्रशासकीय कार्यालयाचे संभाजीनगर व धाराशिव फलकाचे अनावरण मुख्यमंत्र्यांनी केले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी धाराशिव यांनीही जिल्हाधिकारी कार्यालयात उस्मानाबादचे धाराशिव नामांतर करत जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय कार्यालयाचे नामांतर झाल्याचे सांगितले होते. जिल्हा व सत्र न्यायालय उस्मानाबादचे .नामांतर न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे होणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाचे प्रभारी रजिस्टार पी. बी. घुगे यांनी 18 डिसेंबर 2023 रोजी एका परिपत्रकानुसार जिल्हा व सत्र न्यायालय उस्मानाबाद नामांतर धाराशिव असे होणार असे परिपत्रक काढले आहे. न्यायालयातील सर्व न्यायालय धाराशिव न्यायालय म्हणून यापुढे ओळखले जाणार आहेत. 


 
Top