सोलापूर (प्रतिनिधी)-रेल्वे स्थानक परिसरातील चौथ्या टप्प्यात आज हमाल शेड बिल्डिंग तोडण्यात आली. दि.03 डिसेंबर 2023 रोजी मध्ये रेल्वे, सोलापूर विभागाच्या, सोलापूर स्थानकावर अमृत स्टेशन स्कीम अंतर्गत स्टेशन डेव्हलपमेंटचे काम सुरु झाले.

अमृत स्टेशन स्कीम अंतर्गत चौथ्या टप्प्यात आज हमाल शेड बिल्डिंग  जेसीबीच्या मदतीने तोडण्यात आला. या बिल्डिंगचा एरीया 54 होता.  त्यामुळे विस्तारित रेल्वे स्थानक परिसर उपलब्ध होईल आणि प्रवाशांना इतर सुविधा करून देता येणे शक्य होईल. सोलापूर रेल्वे स्थानकाच्या मागचा परिसर रामवाडी एरिया, ज्या ठिकाणी मागचा मुख्य गेट तयार करण्यासाठी आजुबाजूचा परिसर सपाट करीत आहेत, स्टेशन वरील गर्दी कमी करण्यासाठी मागील भागी शुद्धा बुकिंग  कार्यालर तयार कारण्यात येत आहे आणि  नवीन 78  हमाल शेड  तयार करण्यात आला आहे तथा  पार्किंग एरिया शुद्धा तयार होत आहे. यासाठी मंडल रेल प्रबंधक नीरज कुमार दोहरे आणि गती शक्तीचे अवनीश वर्मा  यांच्या मार्गदर्शनाखाली अमृत स्टेशन स्कीम अंतर्गत स्टेशन डेव्हलपमेंटचे काम सुरु आहेत.


 
Top