धाराशिव (प्रतिनिधी)-भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे दि. 06 डिसेंबर रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असुन मा. जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या अध्यक्षतेखाली आज पूर्व नियोजन बैठक संपन्न झाली. नुकत्याच पार पडलेल्या मध्यप्रदेश, राज्यस्थान सह छत्तीसगड विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला मोठे यश लाभले असून धाराशिव जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्षांच्या भव्यदिव स्वागताला सज्ज असल्याचा विश्वास भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केला.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे दि. 06 डिसेंबर रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्यात आमदार राणाजगजितसिंह पाटील व माजी आमदार सुजितसिंह ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात होणाऱ्या कार्यक्रमाच्या पुर्वतयारीसाठीची बैठक आज जिल्हा कार्यालयात पार पडली. या दौऱ्यात प्रदेशाध्यक्ष यांच्या उपस्थितीत बुथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, युवा वॉरीयर्स, सुपर वॉरीयर्स सर्व आघाडी व कार्यकारिणी यांच्यासोबत ते बैठका घेणार आहेत.
तीन राज्यातील विजयानंतर जल्लोष
मध्यप्रदेश, राज्यस्थान सह छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत भाजपाने मिळविलेल्या दणदणीत विजयाबद्दल आमदार राणाजगजीतसिंह पाटील व आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी धाराशिव शहरच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी एकमेकांना पेढे भरवून, फटाक्यांची अतिषबाजी करत, घोषणा देत यशाचा जल्लोष करण्यात आला.
याप्रसंगी जिल्हा समन्वयक नेताजी पाटील, प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रविण पाठक, मकरंद पाटील, सरचिटणीस प्रदिप शिंदे, विकास कुलकर्णी, इंद्रजीत देवकते, उपाध्यक्ष सुनिल काकडे, तालुकाध्यक्ष अजित पिंगळे, राजाभाऊ पाटील, शहराध्यक्ष अभय इंगळे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, दत्ता साळुंके, दत्तात्रय देशमुख, निहाल काझी, प्रविण सिरसाठे, देवा नाईकल,मेसा जानराव, सागर दंडनाईक व इतर भाजपाचे पदाधिकारी, सुपर वॉरीयर्स आणि कार्यकर्ते उपस्थित होते.