लोहारा (प्रतिनिधी)-लोहार तालुक्यातील नागूर येथील साखरबाई शाहूराज पाटील (वय 70) यांचे  वृद्धापकाळाने गुरूवार (दि.14) रोजी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर नागूर येथील सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुले, सुन, नातवंडे असा मोठा परिवार आहे. यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top