तुळजापूर (प्रतिनिधी)-  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सुविद्य पत्नी सौ निलमताई राणे यांनी सोमवार दि. 25 डिसेंबर रोजी तिर्थक्षेञ तुळजापूरला  हेलिक़ँप्टर ने श्रीतुळजाभवानी  मातेची यथासांग पुजा करुन तुळजाभवानीचे मनोभावे दर्शन घेतले. निलमताई राणे मराठा आरक्षण आंदोलन सुरु झाल्यापासुन एकट्याच श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ येत असून, यावेळी तर चक्क हेलिकँप्टरने पोलिस बंदोबस्तात आल्या होत्या.

यावेळी त्यांच्या पुजेचे पौराहित्य त्यांचे पारंपारिक पुजारी राम छञे यांनी केले. या पुर्वी निलमताई कोजिगिरी पोर्णिमाला श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ आल्या होत्या. यानंतर पुढील महिन्यात केंद्रीय मंञी नारायण राणे सह सहकुंटुंब श्रीतुळजाभवानी दर्शनाला येणार असल्याचे  स्पष्ट केले. यावेळी मंदीर संस्थान तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. 


 
Top