धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव येथील पोलीस ग्राउंड वर चालू असलेल्या 22 व्या राज्यस्तरीय सबज्युनियर धनुर्विद्या स्पर्धेत दुसऱ्या दिवशी कंपाउंड राउंड प्रकारात वैयक्तिक मुली मधून महाराष्ट्राची सुवर्णकन्या सातारा येथील अदिती स्वामी हिने 699 गुण, मुलांमधून बुलढाणाच्या मानव जाधवने 702 गुण तर मिक्स इव्हेंट मध्ये साताराच्या अदिती स्वामी आणि ओम कदम प्रथम सेट जिंकत सुवर्ण पदक पटकावत स्पर्धेवर वर्चस्व प्रस्तापीत केले.

महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेच्या अधिपत्याखाली धाराशिव जिल्हा धनुर्विद्या संघटना आणि पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने धाराशिव येथील पोलीस ग्राउंडवर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कंपाउंड राउंड प्रकारचे पारितोषिक वितरण अतिरिक्त पोलीस अधीक्षक शफकत आमला, शुभांगी पाटील आणि स्वाती गडदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेचे कोषाध्यक्ष रंगराव साळुंके, सदस्य अभिजीत दळवी, जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे सचिव प्रवीण गडदे, सहसचिव अभय वाघोलीकर, कॉम्पिटेशन डायरेक्टर गणेश गिरमकर, जिल्हा मार्गदर्शक कैलास लांडगे आदींची प्रमुख उपस्तीथी होती.

कंपाउंड राउंडचा अंतिम निकाल अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय प्रमाणे, मुलामध्ये वैयत्तिक एलिमिनेशन व ओव्हरऑल मध्ये मानव जाधव (बुलढाणा), ओम कदम (सातारा), कपिश सातघरे (पालघर) मुलींमध्ये ओव्हरऑल मध्ये अदिती स्वामी (सातारा), ऋतुजा कसल (अहमदनगर), तेजल साळवे (जालना) वैयक्तिक एलिमिनेशन मध्ये अदिती स्वामी (सातारा), ऋतुजा कसल (अहमदनगर), स्मृती वरपे (सोलापूर), मिक्स एलिमिनेशन मध्ये अदिती स्वामी व ओम कदम (सातारा), रोहन सुतार व आर्या प्रसाद (पिंपरी चिंचवड), ओम खैरे आणि ज्ञानेश्वरी गडधे (पुणे) तर सांघिक प्रकारात मुलामध्ये सातारा, बुलढाणा व सोलापूरतर मुलींमध्ये सातारा, सोलापूर आणि जालना  जिल्ह्याचा समावेश आहे. धाराशिव शहरात पोलीस मुख्यालयात आयोजित या स्पर्धेस धाराशिवकरानी प्रतिसाद देत मोठी स्पर्धेतील धनुर्धरांचा थरार पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.


 
Top