धाराशिव (प्रतिनिधी)-तीन राज्यातील भाजपाच्या विजयानंतर इंडिया आघाडीतील काही लोकांनी ईव्हीएम मशीनवर अक्षेप घेतला. हा आक्षेप म्हणजे मतदारांनी केलेल्या मतदानाचा अपमान आहे. या आक्षेपामुळे लोकशाहीचाही अपमान आहे अशी टिका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यम प्रतिनिधी प्रतिनिधीशी बोलताना केली.

बावनकुळे धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर बुधवार दि. 6 डिसेंबर रोजी आले होते. त्यांनी आपल्या दौऱ्याची सुरूवात तुळजापूर येथून श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेवून केले. त्यानंतर धाराशिव येथे तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात भाजपाच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी रवाना झाले. पुढे बोलताना म्हणाले की, उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेने 2019 ला युतीमध्ये लोकसभा व विधानसभा निवडणूक लढवली होती.त्यावेळेस शिवसेनेचे आमदार व खासदार निवडून आले होते. त्यावेळेस ठाकरे यांना ईव्हीएम मशीन संदर्भात काही वाटले नव्हे ते का? असा मुद्दा उपस्थित केला. बावनकुळे यांनी मराठा आरक्षण संदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला दिलेले आरक्षण उध्दव ठाकरे यांना टिकवता आले नाही. त्यांना चांगला वकील लावून बाजू सुध्दा मांडता आली नाही. त्यामुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही. म्हणून आरक्षणाचे खरे मारेकरी हे उध्दव ठाकरे आहेत. त्यांना काळे झेंडे दाखवले पाहीजे असा सल्ला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मराठा समाजाच्या आंदोलकांना दिला. 

यावेळी भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. अनिल काळे, विनोद गपाट, भाजप जिल्हाध्यक्ष चालुक्य, युवराज नळे, संतोष बोबडे यांची उपस्थिती होती. 


खरे गुन्हेगार ठाकरे

बावनकुळे तुळजाभवानी मंदिरात दर्शनाला जात असताना तुळजाभवानी मंदिर परिसरात मराठा आंदोलकांनी बावनकुळे यांना काळे झेंडे दाखवून त्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. बावनकुळे यांनी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना उध्दव ठाकरे यांच्यावर टिका केली. खरे मराठा आरक्षणाचे गुन्हेगार तर उध्दव ठाकरे आहेत. त्यांचे सरकार असताना त्यांना चांगला वकील लावून मराठा आरक्षण टिकवता आले नाही हे त्यांचे अपयश आहे. म्हणुन मराठा आंदोलकांनी उध्दव ठाकरे यांना काळे झेंडे दाखवले पाहिजे अशी टिका बावनकुळे यांनी ठाकरे यांच्यावर केली. त्याच बरोबर आमचे सरकार टिकणारे मराठा आरक्षण देण्यास कटिबद्ध असल्याचेही बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.



 
Top