धाराशिव (प्रतिनिधी)- महामानव, बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वांण दिनानिमित्त येथील बहुजन योद्धा सामाजिक संघटनेच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास दि.6 डिसेंबर रोजी अभिवादन करण्यात आले.
धाराशिव शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच नागरीकांनी गर्दी केली. तर बहुजन योध्दा सामाजिक संघटनेच्यावतीने अध्यक्ष धनंजय शिंगाडे, रावसाहेब शिंगाडे, दादासाहेब जेटीथोर कमलाकर बनसोडे, माजी तहसीलदार रवी कांबळे, यु.व्ही.माने माजी नायब तहसीलदार अरुण बनसोडे,सुनिल कांबळे, श्रीकांत माळाळे, नितीन माने, दिलीप वाघमारे, अशोक बनसोडे, सुनिल बनसोडे, पोपट सिरसाट, यशवंत शिंगाडे, यांनी अभिवादन केले.यावेळी भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.