धाराशिव (प्रतिनिधी)-डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र परिसर सभागृहात तुळजापूर येथील प्रा.निना बाळासाहेब कदम डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे पीएचडी प्रदान समारंभानिमित्त सत्कार करण्यात आला याप्रसंगी शोधनिबंध मार्गदर्शिका माजी प्राचार्या डॉ.अनार साळुंके  एक्सटर्नल रेफरी इफ्तिखार खैरदी, प्रा. सी.बी.खेडगी, व्हायवा कमिटी चेअरमन विद्यापीठ उपकेंद्राचे इंग्रजी विभागाचे प्रमुख आर. बी. चौगुले, प्रा. कोकणे, प्रा. अमर सोनटक्के, संतोष, साळुंखे, प्रा. वाय. ए. डोके उपस्थित होते. प्रा निना कदम यांच्या शोधनिबंधाचा विषय -“ Representation of women in the selected plays of Wole Soyina “ हा असून पुणे येथील अरिहंत महाविद्यालय कॅम्प येथे कार्यरत असून प्राथमिक शिक्षण तुळजापूर येथे होऊन तुळजापूर शैक्षणिक वातारण नसताना शिक्षणाची आस मनस्वी धरून पहिली महिला डॉक्टरेट प्रा. निना कदम यांना मिळाल्या बद्दल नातेवाईक, स्नेही, तुळजापूर मतदार संघाचे विधानसभा सदस्य शहरवासी, पुजारी यांनी अभिनंदन कौतुक होत आहे.


 
Top