भूम (प्रतिनिधी)-आलम प्रभू यात्रेनिमित्त भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांच्या हस्ते करण्यात आले.
आलम प्रभू यात्रेनिमित्त मार्केट यार्ड जवळील क्रीडा संकुलाच्या मैदानामध्ये भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये भरघोस असे बक्षीस ठेवण्यात आले असून आज पासून क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ होणार आहे यावेळी बालाजी तोडकरी, नारायण वरवडे, विनोद आकरे, अमर भाई, नवाज शेख, गणेश ढेकळे, धनंजय गाढवे आदी यावेळी उपस्थित होते.