कळंब (प्रतिनिधी)- येथील बस आगार वेगवेगळ्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. अशातच सकाळी कळंब ते माजलगाव जाणारी बस डेपोत स्वच्छता केली नसतानाही ती बस प्रवासाकरिता वाहन परीक्षकांनी वाहक चालकांना दिली. स्थानकात उभी करून प्रवासी बसले पण एक अधिकारी प्रवास करण्यासाठी बसमध्ये चढताच सर्व गाडी अस्वच्छ दिसली. चालकास स्वच्छतेबाबत विचारणा केली असता चालकाने स्वतःच हातात झाडू घेऊन प्रवासी व अधिकारी समक्ष चक स्थानकतच बस झाडून काढली. 

याबाबत अधिक वृत्त असे की, दि. 27 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजता कळंब ते माजलगाव जाणारी बस क्र. एम.एच. 20 बी. एल. 1586 ही बस चालक नेहमीप्रमाणे बस घेऊन प्रवासी भरण्याकरिता स्थानक आणून उभा केली. आ मध्ये प्रवासीही बसले तितक्यात धाराशिव आगाराचे  वाहतूक निरीक्षक  आर. आर. जानराव हे प्रवासाकरिता त्या बस मध्ये बसले असता त्यांनाही बस अस्वच्छ दिसली. त्यांनी त्याचा जॉब चालकाला विचारला परंतु चालकांनी हे प्रकरण न लांबवता लागलीच हातात झाडू घेऊन प्रवासी खाली उतरून अधिकाऱ्यासमोरच चक्क स्वतःच बस झाडून काढली.


4 स्वच्छक असतानाही 

कळंब बस आगारात एकूण फुलपगारी 4 स्वच्छक आहेत. बस मात्र अस्वच्छता असतात. काही बस धूत नाहीत. तर काही बस झाडतही नाही. अशा या स्वच्छकावर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहन परीक्षकांची नेमणूक केली जाते. पण वाहन परीक्षकच याकडे साफ दुर्लक्ष करत असल्यामुळे व त्यांच्या मनमानी कारभारामुळे सर्व चालक परेशान आहेत. या वाहन परीक्षकावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी प्रवाशातून जोर धरत आहे. 


लाखो रूपयाचे टेंडर

कळंब स्थानक स्वच्छ करण्यासाठी लाखो रुपयांचे टेंडर एका खाजगी ठेकेदाराला देण्यात आले आहे. परंतु हे बस स्टॅन्ड कधीच स्वच्छ आणि चकाचक नसते. ठेकेदार मात्र पैसे उचलून आपले उकळ पांढरे करून घेत असल्यामुळे याला जिम्मेदार कोण? असा प्रश्न प्रवाशातून विचारला जात. कळंब बस आगरात स्वच्छतेचा प्रश्न वेळोवेळी ऐरणीवर येत आहे. त्याचप्रमाणे धुळीचा प्रश्न, बस गाड्या वेळेवर जात नाहीत, तर काही बस नादुरुस्त अवस्थेत असतात. त्यामुळे वाहक-चालक हैराण झाले आहेत. अशा प्रशासनाबद्दल प्रवाशातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्याने तातडीने लक्ष देऊन हे प्रश्न तातडीने सोडवावे व प्रवाशांना सुलभ प्रवास करण्यासाठी नवीन बस उपलब्ध करून द्याव्यात असेही मागणी प्रवाशातून जोर धरत आहे.


 
Top