धाराशिव (प्रतिनिधी)-संविधान दिनानिमित्त भारत सरकार द्वारा नोंदणीकृत ट्रस्ट क्र.1357/17 आंबेडकर ग्लोबल फाउंडेशन च्या वतीने 26 नोव्हेंबर संविधान दिन सोहळ्याचे निमित्ताने श्रीमती आशा राऊत/सुरवसे यांना भारत भूषण 2023 हा पुरस्कार जाहीर झाला होता. त्यांनी तो आज दिल्लीत आयोजित कार्यक्रमात पाहुण्यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार स्वीकारला आहे.

सौ आशा राऊत-सुरवसे ह्या ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संचलित विद्याभवन हायस्कूल कळंब येथील उपक्रमशील शिक्षिका यांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारत भूषण सर्वोत्कृष्ट शिक्षिका 2023 ने सन्मानित करण्यात आले आहे. नवी दिल्ली येथील कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया नवी दिल्ली येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यांचे शिक्षण युसुफ वडगाव हायस्कूल ता. केज जि. बीड येथे झाले असून, त्यांनी यापूर्वी ज्ञानउद्योग विद्यालय येरमाळा व ज्ञान प्रसार विद्यालय मोहा येते काम केले आहे.

शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. याप्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री सामाजिक न्याय विभाग पौर्णिमा भौमिक, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या सदस्या सौ सुरेखा लांबतुरे, अशोक लांबतुरे, सफाई कामगार आयोगाचे अध्यक्ष एम. वेंकटेश्वर, भाजपा राष्ट्रीय महामंत्री दुष्यंतकुमार गौतम, अध्यक्ष इनरव्हील क्लब डॉक्टर उर्वशी मित्तल, आंबेडकर ग्लोबल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. मनीष गवई आदी मान्यवर उपस्थित होते.

त्यांच्या झालेल्या सत्कारामुळे ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव प्राध्यापक डॉक्टर अशोकराव मोहेकर, अध्यक्षा अनिल मोहेकर, उपाध्यक्ष प्रा. आबासाहेब बारकुल व शाळेचे मुख्याध्यापक डॉ. विलास पवार, उपमुख्याध्यापिका पाटील व पर्यवेक्षक खामकर दिगंबर सर्व सहकारी बंधू भगिनींनी कौतुक व अभिनंदन होत आहे.


 
Top