धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील प्रसेना प्रतिष्ठानच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात  110 अनुयायांनी रक्तदान करून अभिवादन केले.

शहरातील प्रसेना प्रतिष्ठानच्या वतीने सलग 15 व्या वर्षी  महापरिनिर्वाण दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. याही वर्षी बुधवार, 6 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन, धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. शिल्पा डोमकुंडवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

या रक्तदान शिबिरात दिवसभरात 110 रक्तदात्यांनी रक्तदान केले.  राजाभाऊ बनसोडे, चंदन लांडगे,  सचिन बनसोडे, सागर शेंडगे, मिलिंद पेठे, दीपक गंभीरे, विजय बनसोडे,   यशवंत माळाळे, क्षमीनल सरवदे, अमोल बनसोडे, निलेश भोसले, राहुल वाघमारे, सोनू माळाळे, अक्षय बनसोडे, संतोष गायकवाड, आकाश गंगावणे, प्रतीक गायकवाड, नंदू सोनवणे आदींनी रक्तदान केले. रक्तदात्यांना प्रतिष्ठानच्या वतीने चहा, फळे व नाष्टा देण्यात आला. यावेळी जिल्हा रक्तपेढीच्या रक्तसंक्रमण कर्मचारी डॉ. विवेक कोळगे, डॉ.राजेंद्र लोंढे, विठ्ठल कांबळे,यांच्यासह ईतर कर्मचारी दिवसभर उपस्थित होते. हे रक्तदान शिबीर प्रसेना प्रतिष्ठानचे अध्यक्ष  तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष संदीप बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.

या शिबिराच्या यशस्वितेसाठी, प्रज्योत बनसोडे, नागराज साबळे, दादासाहेब मोटे, रुपेश बनसोडे,जीवन भालशंकर, सचिन डोंगरे, पृथ्वीराज सरवदे, कैलास लोंढे, शैलेंद्र शिंगाडे, सुशांत बनसोडे, सुमित क्षीरसागर, कल्पेश बनसोडे यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले.


महिलांचा लक्षणीय सहभाग

यावेळी निशा गायकवाड, लक्ष्मी ढाले, रेणुका माने, सोनी भालशंकर, रिया गायकवाड, नेहा ढाले, प्रतिभा हावळे, सुवर्णा गायकवाड, मीनाक्षी गायकवाड या महिलांनीही रक्तदान केले.


 
Top