भूम (प्रतिनिधी)- भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते जनसंघाचे संस्थापक माजी पंतप्रधान, भारतरत्न स्व.अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती  भा.ज.पा.कार्यालय साजरी करण्यात आली.

सोमवार दिनांक 25 डिसेंबर 2023 रोजी भूम तालुका भारतीय जनता पार्टीच्यावतीने ज्येष्ठ नेते , जनसंघाचे संस्थापक,  माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी केली, या निमित्ताने त्यांनी  राबवलेल्या विविध महत्त्वकांक्षी योजनांची जाणीव जागृती करण्यात आली . युवकांसमोर प्रबोधनातून मांडण्यात आले. यावेळी पक्षाचे प्रदेश निमंत्रित सदस्य व भुम परंडा वाशीचे विधानसभा प्रमुख बाळासाहेब क्षिरसागर, तालुकाध्यक्ष महादेवजी वडेकर, ऍड किशोरजी डोके हाय कोर्ट,  कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अंगद मुरुमकर, माजी नगरसेवक रोहन जाधव, तालुका उपाध्यक्ष अमोल बोराडे, बाबासाहेब वीर, तालुका सरचिटणीस संतोष सुपेकर, शहर अध्यक्ष शंकर खामकर, सरचिटणीस  हेमंत देशमुख, संतोष आवताडे, कामगार मोर्चाचे मराठवाडा प्रदेश सदस्य तथा पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचे भूम तालुका अध्यक्ष सचिन बारगजे, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष प्रदीप साठे, शांतीराज बोराडे आदि पदाधिकारी उपस्थित होते.


 
Top