सोलापूर (प्रतिनिधी)-मध्य रेल्वेने एप्रिल ते नोव्हेंबर - 2023 या कालावधीत रु. 12,497.41 कोटींचा विक्रमी महसूल प्राप्त केला. जो एप्रिल ते नोव्हेंबर - 2022 च्या एकूण रु. 10,848.89 कोटींपेक्षा 15.20% ने अधिक आहे. मध्य रेल्वेने आपल्या वाणिज्यिक महसुलात सातत्यपूर्ण सर्वोत्तम कामगिरी करण्याची आपली गती कायम ठेवलेली आहे. मध्य रेल्वेने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 8 महिन्यांत म्हणजेच एप्रिल ते नोव्हेंबर 2023-24 दरम्यान, रु. 12,497.41 कोटींचा महसूल प्राप्त केला. हा महसूल मागील वर्षी रु. 10,848.89 कोटी इतका होता, तो चालू वर्षात तुलनेने 15.20% अधिकचा आहे.

एप्रिल ते नोव्हेंबर-2023 या कालावधीत :- मध्य रेल्वेने एप्रिल ते नोव्हेंबर 2023 या कालावधीत 1,039.20 दशलक्ष प्रवाशांची वाहतूक केली आहे, त्या तुलनेत एप्रिल ते नोव्हेंबर-2022 या कालावधीत 940.78 दशलक्ष प्रवाशांची वाहतूक केली होती.  गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ 10.46%  इतकी मोठी आहे. मध्य रेल्वेने एप्रिल ते नोव्हेंबर 2023 या कालावधीत प्रवासी महसूल रु. 4699.10 कोटी  प्राप्त केला. गतवर्षीच्या एप्रिल ते नोव्हेंबर-2022 मधील रु. 4077.62 कोटी महसुलाच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षात 15.24%ची मोठी वाढ झाली. 

एप्रिल ते नोव्हेंबर 2023 या कालावधीत वस्तू व सामानाच्या वाहतूकीचा महसूल रु. 6146.83 कोटी इतका होता. एप्रिल ते नोव्हेंबर - 2022 या कालावधीत हा महसूल रु. 5380.15 कोटी होता, तुलनेने ह्यात 14.25% ची वाढ झाली. एप्रिल ते नोव्हेंबर 2023 या कालावधीत, इतर कोचिंग, सामान, नॉन-फेअर महसूल तसेच विविध माध्यमांतून प्राप्त झालेला महसूल (विविध, पार्किंग, केटरिंग, विश्रामगृह, शौचालय वापर इत्यादीसह) रु.1651.48 कोटी इतके आहे. गतवर्षी एप्रिल ते नोव्हेंबर - 2022 कालावधीत प्राप्त झालेल्या रु.1391.12 कोटी महसुलाच्या तुलनेत, तब्बल 18.71% ची वाढ झाली. 

नोव्हेंबर-2023 मध्ये :- मध्य रेल्वेने नोव्हेंबर-2022 मध्ये 130.76 दशलक्ष प्रवाशी वाहतूक केली.  नोव्हेंबर 2023 मध्ये हाच आकडा 131.56 दशलक्ष इतका होता. मध्य रेल्वेने नोव्हेंबर 2023 मध्ये प्रवासी महसूलातून रु. 595.56 कोटी प्राप्त केले, मागील वर्षाच्या नोव्हेंबर-2022 कालावधीत हा आकडा रु. 570.86 कोटी इतका होता.

नोव्हेंबर-2023 दरम्यान वस्तू आणि सामान वाहतूकीतून रु. 785.51 कोटी इतका महसूल मिळाला.  तोच नोव्हेंबर-2022 मध्ये रु.781.83 कोटी होता. 

नोव्हेंबर-2023 मध्ये इतर कोचिंग, सामान, नॉन-फेअर महसूल व इतर विविध महसूल (विविध, पार्किंग, केटरिंग, विश्रामगृह, शौचालये वापर इत्यादीसह.)  रु. 203.82 कोटी प्राप्त केले. नोव्हेंबर-2022 च्या कालावधीत रु.191.85 कोटी इतका होता.

मध्य रेल्वेने उत्पन्नाला चालना देण्यासाठी राबवलेल्या विविध उपक्रम, जसे की विभागांवर व्यवसाय विकास केंद्र (बीडीयू) स्थापन करणे तसेच इतर भाडे-व्यतिरीक्त महसूल उपक्रम आणि मुख्यालय कार्यालयातील विपणन व इतर तत्सम नाविन्यपूर्ण कल्पनांमुळे महसूलात वाढ झालेली आहे.


 
Top