धाराशिव (प्रतिनिधी)-कळंब तालुक्यातील दहिफळ येथील बापुराव बाबासाहेब मते यांची कन्या सोनल मते हिची मुंबई विद्युत विभाग अंतर्गत  कांदिवली येथे सहाय्यक अभियंता म्हणून नेमणूक झाली आहे.तिच्या निवडीने गावाची अभिमानाने मान उंचावली आहे.सोनल मते ही त्यांच्या कुटुंबातील पाचवी अधिकारी आहे.

एकाच घरात पाच अधिकारी असणारे गावातील एकमेव कुटुंब आहे.सोनलचे वडील शेतकरी  आहेत.आपल्या मुलीला अधिकारी बनवायचे म्हणून सर्व परिने प्रयत्न केले.मुलीने अभ्यास करून वडीलांचे स्वप्न साकार केले आहे. आपल्या चुलता,चुलती प्रमाणे त्यांचे मार्गदर्शन घेऊन यश संपादन केले आहे.तिचे कौतुक म्हणून गावकऱ्यांनी तिचा सत्कार ग्रामदैवत श्री खंडोबा मंदिरात सत्कार केला आहे. यावेळी गावकऱ्यांच्या वतीने पांडुरंग मते व अच्युत मते यांनी मनोगत व्यक्त करताना गावाचं नाव उज्वल करून यशस्वी व्हावे अशा शुभेच्छा दिल्या. यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माजी उपसरपंच प्रल्हाद मते, सरपंच चरणेश्वर पाटील अच्युत महाराज मते, पांडुरंग मते, रामेश्वर मते तुकाराम मते, रामेश्वर भातलवंडे, बापुराव मते,सुब्राव भातलवंडे,सुजीत भातलवंडे,तात्या भातलवंडे, अनंत मते, पांडुरंग पाटील, नारायण भातलवंडे, पोपट पाटील, सुनील पाटील, दत्तात्रय मते भैरवनाथ कुटे, संजय भातलवंडे, जयवंत भातलवंडे, योगराज पांचाळ, रंगनाथ डांगे,फुलचंद काकडे,आई त्रिशाला बापुराव मते, संगीता कांतीलाल मते, छाया दत्तात्रय सकुंडे, गीतांजली गणेश भातलवंडे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top