भूम (प्रतिनिधी)-तालुक्यामधील सामनगाव येथे पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून आरोग्य विभागाच्या वतीने आयुष्यमान भव आरोग्य शिबिराचे आयोजन वारकरी संप्रदाय व भजनी मंडळातील सदस्यासाठी सामनगाव येथे प्रतिबंधात्मक व उपचारात्मक सर्व रोगासाठी दिनांक 31 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सामनगाव येथील सद्गुरू शामनाथ महाराज देवस्थान तीर्थक्षेत्र जुने येथे करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये स्त्रीरोग हृदयरोग, नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप, रक्तदाब, मधुमेह तपासणी, आयुष्यमान कार्ड वाटप, आभा कार्ड वाटप, कॅन्सर तपासणी, सोनोग्राफी, एक्स-रे, आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथिक इत्यादी आजाराची तपासणी व औषधोपचार करण्यात येणार आहेत. यासाठी सोबत येताना दोन पासपोर्ट साईज फोटो व आधार कार्ड आणावे व सर्व जुन्या रिपोर्ट व फाईल सोबत आणावे. या शिबिरासाठी तज्ञ डॉक्टर व सुपर स्पेशलिटी डॉक्टरांच्या मदतीने मोफत सेवा देण्यात येणार आहे. तरी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.


 
Top