तुळजापूर (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्षपदी सुरतगाव ता. तुळजापूर येथील दादासाहेब विठ्ठल घोडके यांची नियुक्ती करण्यात आली.
या निवडीचे पञ भाजप प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांच्या हस्ते जिल्हाध्यक्ष चालुक्य यांच्या उपस्थितीत देण्यात आले. यावेळी युवामोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहराजे निंबाळकर, तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सचिन पाटील, रामचंद्र कुलकर्णी, गजानन वडणे, गुलचंद व्यवहारे, विनोद गपाट, साहेबराव घुगे, विकास मलबा, हरिभाऊ जाधव, राजु सुरते, रोहीत गवळी सह भाजप कार्यकते मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.