भूम (प्रतिनिधी)- “कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर “ या भैरवीने भूम येथील श्रोते मंत्रमुग्ध झाले. मराठवाड्यातील प्रख्यात शास्रीय गायक रमाकांत गायकवाड यांच्या शास्रीय संगीत व अभंगवाणी कार्यक्रमाचे अयोजन आलमप्रभू व्याख्यानमालेचे वतीने येथील ज्योतीक्रांती सभागृहात करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरूवात राग यमन ने केली. यानंतर सखी येरी आली पिया बिन त्यांनी यामध्ये झाला नावाचा प्रकार सादर करत श्रोत्याच्या टाळ्या घेतल्या. यानंतर त्यांनी पतीयाला घराणामधिल ठुमरी सादर करत मैफल रंगवली. यानंतर त्यांनी सावनकी रुत आयी, सजन प्रीतम घर नही आये यासह बाली उमरीया रैन अंधेरी रह रह कर जीया घबराये, याद पिया की आये व चुपके चुपके रात दिन आसु बहाणा याद है ही गजल सादर करत उपस्थित प्रेक्षाच्या टाळ्या घेतल्या. यानंतर त्यांनी अभंगवाणीच्या माध्यमातून विसावा विठ्ठल सुखाची सावली, काळ देहासी आला धावुन हा अभंग सादर केले. शेवटी कैवल्याच्या चांदण्याला भुकेल चकोर ही भैरवी घेवुन कार्यक्रमाची सांगता केली. त्यांना तबला साथ कौस्तुब तळेकर, संवादिनी गणेश जगदाळे, पखवाज ऋषिकेश शिंदे, सहगायक प्रणय वाघ यांनी केली. कायक्रमाचे सुत्रसंचलन ए. पी. देशपांडे यांनी केले. कार्यक्रमासाठी भूम शहर व बीड, धाराशिव, तेरखेडा, कळंब, बार्शी येथील श्रोत्यांनी मोठी गर्दी केली होती.
यावेळी प्रख्यात गायक रमाकांत गायकवाड यांचा सत्कार हभप. धर्मराज दादा महाराज सामनगावकर यांच्या हस्ते आलमप्रभू व्याख्यानमालेच्या वतीने करण्यात आले. यावेळी भूम तालुक्यातील प्रख्यात पखवाज वादक आसारम साबळे, तबला संगीत विशारद प्रसाद देशमुख व हभप. अरुण शाळु महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. गेल्या 12 वर्षापासून आलमप्रभू व्याख्यानमालेच्या माध्यमातून कँप्टन अजय मनसुके यांनी व्याख्यानमालेच्या माध्यमातून साहित्यीक यांच्या व्याख्यानासोबत शास्रीय संगीताच्या मैफलीच्या आयोजन करत आहेत.