उमरगा (प्रतिनिधी)-आर्थिक अडचणीत असलेल्या धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेला अर्थसहाय्य करण्यासाठी चेअमरन बापूराव पाटील व माजी चेअरमन सुरेश बिराजदार यांनी दि.  29 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबई येथे भेट घेवून दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, जिल्हा मध्यवर्ती बँकेची सध्याची आर्थिक स्थिती चांगली नाही. बँकेसमोरील प्रश्न व अडचणींवर मात करण्यासाठी बँकेमार्फत सुरू असलेल्या प्रयत्नांचा सहानुभूतीपूर्वक विचार करा. अजित पवार यांनी जिल्हा बँकेला निधी मिळवून देण्याबाबत आश्वस्त केले. यावेळी व्हाईस चेअरमन मधुकर मोटे, प्रकाश आष्टे, कार्यकारी संचालक व्ही. एल. घोगरे उपस्थित होते.


 
Top