भूम (प्रतिनिधी)- शहरात वाढलेल्या झाडाच्या फाद्या विजेच्या तारांना आडचणीच्या ठरत आसल्याने सातत्याने वीजपुरवठा खंडीत होत असल्याने वीज वितरण कंपनीकडून या वाढलेल्या फाद्या तोडण्याची मोहिम राबवली शहरात नगर पालिकेने शहरातील नागरिकांना चांगला ऑव्सीजन मिळावा यासाठी बहुतांश वार्डात यामध्ये विविध झाडांची वृक्ष लागवड केली होती. हे झाडे चांगली जोपासली गेली आहेत. परंतू वृक्ष लागवड करताना बहुतांश ठिकाणी शहरातील विजेच्या ताराखाली लावल्यामुळे या झाडाच्या फांद्या बहुतांश ठिकाणी विजेच्या तारावर गेल्यामुळे बहुतांश घर्षण होवुन सातत्याने विज गायब होत होती. यासाठी विजवितरण कंपनीने समर्थ नगर, कृषी उत्पन्न बाजार समिती रोड यासह शहरात इतर ठिकाणी ही मोहिम राबवुन तारेवर आलेल्या फाद्या तोडण्यात आल्या. यामुळे सातत्याने विजेच्या तारेच व झाडाच्या फाद्याचे होणारे घर्षण आता थांबणार आहे. यासाठी विजवितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली वीज कर्मचारी यांनी ही मोहिम राबवली. परंडा रोडवरील फ्लोरा चौकात ही मेन लाईनवरील तारावर झाडाच्या फाद्या वाढल्या असून, या भागात फांद्या तोडण्याची मोहिम राबवावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.


 
Top