धाराशिव (प्रतिनिधी)- तेली समाजाचे आराध्य दैवत संताजी जगनाडे महाराज यांच्या 399 व्या जयंती निमित्त श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जन्मोत्सव साजरा करण्यात येत आहे. या कार्यक्रमास धाराशिव जिल्हयाचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंम्बासे, नगर परिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती वसुंधरा फड यांच्या हस्ते प्रतिमा पुजन व महाराजांना अभिवादन करण्यात येणार आहे.

तसेच सर्व धाराशिव जिल्ह्यातील समाज बांधव, पदाधिकाऱ्यांना शुक्रवार दि. 8 डिसेंबरला सकाळी 11 वाजता संताजी जगनाडे महाराज चौक, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या समोर धाराशिव येथे जगनाडे महाराजांना अभिवादन करण्याकरिता उपस्थित रहावे असे आवाहन धाराशिव जिल्हा तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर यांनी केले आहे.


 
Top