तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील वेताळनगर भागात राहते घराचे कुलुप तोडुन अज्ञात चोरट्यांनी घरातील 43 हजार 800 रुपये किमतीचे संसारपयोगी साहित्य चोरुन नेल्याची घटना सोमवार दि. 25 डिसेंबर रोजी पहाटे घडली.
या बाबतीत अधिक माहीती अशी की, देवीदास दाजीराव पाटील, रा. वेताळनगर तुळजापूर जि. धाराशिव यांचे राहाते घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि.25 रोजी 00.00 ते 05.00 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन घरातील संसार उपयोगी वस्तु(साहित्य) गॅस, पातीले, वॉटर क्युरीफाय, कुक्कर, सायकल व इतर संसार उपयोगी वस्तु असा एकुण 43,800 रूपये किंमतीचा माल चोरुन नेला. अशा दिलेल्या फिर्यादी वरुन पोलिसांनी तुळजापूर पो. ठाणे येथे कलम 457, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे. शहरीतील वाढत्या चोऱ्या रोखण्यासाठी पोलिसांनी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.