भूम (प्रतिनिधी)-शहरातील उच्चभ्रु वसाहत असणाऱ्या समर्थ नगर भागामधील रहिवासी असणारे सिद्धिविनायक ज्वेलर्सचे मालक नेहमीप्रमाणे स्वतःचे दुकान बंद करून घराकडे जात असताना अज्ञात चार इसमाकडून गाडी आडवी लावून जीव घेणा हल्ला रिवाल्वर चालवून केला असल्याने गोळी दुसरीकडेच आदळल्याने गोळीचा काहीं भाग दहिवाळ यांच्या पायात घुसला दि.29 डिसेंबर सायंकाळी आठ वाजताच्या दरम्यान समर्थ नगर भूममध्ये घडली आहे.

तक्रारदार दहिवाळ यांनी सांगितले आहे की, दैनंदिन प्रमाणे आजही ते आपले दुकान सायंकाळी पावणे आठच्या सुमारास बंद करून समर्थ नगर येथील घराकडे जात होते. समर्थ नगर भागातील घराजवळच स्वतः आणि त्याचे वडील बुलेट गाडी वरती दुकानातले ऐवज घेऊन जात असताना चालू गाडी असताना पाठीमागून दोन टू व्हीलर वरती चौघे चोरटे यांनी गाडी आडवी लावली. माझ्या हातात असणारी ज्वेलर्सची बॅग हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी माझी त्यांची झटापट झाली. मी बॅग सोडली नाही. ओरडण्याचा आवाज होत गेला असल्याने एका इसमाने ठोक ठोक असं म्हणत एकाने रिवाल्वर काढून गोळी मारण्याचा प्रयत्न केला. परंतु ती गोळी अंधारात कशावर तरी आदळून रिटर्न माझ्या तळ पायाला लागली आहे. लोकांचा आवाज येऊ लागल्याने चोरटे पळाले व मी तात्काळ भूम पोलिसाकडे धाव घेतली अशी माहिती विनायक दहिवाळ यांनी सांगितली.

या प्रकरणी भूम पोलिसात अनोळखी व्यक्तीच्या विरोधात लुटमारीचा व पिस्टलचा धाक दाखवल्या प्रकरणी गून्हा नोद कऱण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनरीक्षक शशिकांत तावर हे तपास करत आहेत. सोबत पोलीस नाईक अजित कवडे, शशिकांत खोत आदि पोलीस कर्मचाऱ्यांनी  तपास करित आहेत. विनायक दहिवाळ यांना प्रथम उपचारासाठी भूम ग्रामीण रुग्णालयात पाठवून देण्यात आले. भूम ग्रामीण रुग्णालयामध्ये डॉ. संतोष खराडे यांनी विनायक दहिवाळ यांच्यावरती प्राथमिक उपचार करून तळपायात लागलेली गोळीचा अंश बाहेर काढला.  ते पुढे तपासणीसाठी पाठवून देण्यात येणार असल्याचे डॉ. खराडे यांनी सांगितले. एकंदरीत ही घटना भूम शहरात घडली असल्याचे कळताच सर्व सोनार संघटना, नागरिक, पत्रकार यांनी पोलीस व ग्रामीण रुग्णालयाकडे धाव घेतली. या घटनेमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


 
Top