धाराशिव (प्रतिनिधी)- येथील पोलीस अंमलदार सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी गोविंद पवार यांची तर व्हाईस चेअरमनपदी गीतांजली फुलसुंदर यांची व सचिवपदी महेशकुमार कचरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गीतांजली फुलसुंदर यांची पहिल्यांदाच दि.29 नोव्हेंबर रोजी निवड करण्यात आली आहे. 

धाराशिव शहरातील पोलीस वेल्फेअर कार्यालयातील पोलीस अंमलदार सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयात ही निवडणूक घेण्यात आली. या पतसंस्थेचे स्विकृत तज्ज्ञ सदस्य संचालक म्हणून अतुल जाधव यांची तर संचालक म्हणून किरण डोके, शिवाजी गवळी, योगेश सुर्यवंशी, अजिनाथ तरंगे, मकसूद काजी, भाग्यश्री देशमुख, पंडित मुंडे यांची निवड करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आंबीलपुरे यांनी कामकाज पाहिले. या बँकेचे भाग भांडवल 15 कोटी 50 लाख रुपये असून सभासद संख्या 1200 आहे. यावेळी आजी-माजी चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top