धाराशिव (प्रतिनिधी)- बॉम्बे सायन्स टीचर असोसिएशन मुंबई यांच्या तर्फे घेण्यात आलेल्या डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा 2023 -24 च्या ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परीक्षेत श्रीपतराव भोसले हायस्कूलचे तब्बल तीन विद्यार्थ्यांने लेखी परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान पटकावले असून ते पुढील प्रात्यक्षिक फेरीसाठी पात्र ठरले आहेत.

यामध्ये कु. मयुरेश महेश स्वामी प्रथम तर द्वितीय कु. अर्पिता नेताजी मुळे व तृतीय क्रमांक सिद्धांत नरसिंग माने या विदयार्थ्यांनी यश संपादन करुन पुढील प्रात्याक्षिक फेरीसाठी पात्र झाले.तर प्रणव कदम, आर्यन पौळ, मनस्वी इंगळे, युवान माने, भक्तराज वाघमारे, सिद्धी सावंत, क्षितीज क्षीरसागर , सानवी पडवळ, अर्जुन वाघ, सोहम भिंगडे, रमानी म्हेत्रे हे सर्व या परीक्षेत उत्तीर्ण झाले असून या विदयार्थ्यांना मार्गदर्शन करणारे सर्वच विज्ञान शिक्षक, कुलदीप चिंचोलीकर आणि या परीक्षेतील यशाबद्दल सर्वांचे प्रशालेचे प्राचार्य साहेबराव देशमुख, उपप्राचार्य एस. के.घार्गे, उपमुख्याध्यापक एस .बी. कोळी ,पर्यवेक्षक वाय .के . इंगळे, एस.जी. कोरडे, श्रीमती बी.बी. गुंड, एन.एन. गोरे, आर.बी. जाधव, के.वाय. गायकवाड, डी. ए. देशमुख आणि गुरुवर्य के. टी. पाटील फाऊंडेशन प्रमुख विनोद आंबेवाडीकर यांनी या  सर्वांचे विशेष कौतुक केले. तर पुढील फेरीसाठी गुणवत्ता यादीत आलेल्या या  गुणवंतांना संस्थेचे अध्यक्ष सुधीर पाटील, संस्था सरचिटणीस प्रेमाताई पाटील व प्रशासकीय अधिकारी तथा संचालक आदित्य पाटील, कार्यलयीन अधिक्षक बालाजी घोलप यांनी शुभेच्छा दिल्या.


 
Top