भूम (प्रतिनिधी)- आजकालच्या बदलत्या जिवण शैलीमुळे फायबर अन्नाचा वापर वाढत असून, हा वापर बंद करुन तृणधान्याचा वापर दैनदिन आहारात होण आवश्यक आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय पोष्टिक तृणधान्य 2023 अंतर्गत उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय व गुरुदेव दत्त हायस्कुल यांच्या संयुक्त विद्यमानाने मिलेट रँली काढण्यात आली.

या रॅलीमध्ये विविध पौष्टिक तृणधान्याचे ज्वारी, बाजरी, राळा, भगर, नाचणी, वरई यांच्या आहारातील महत्वाबद्दल जनजागृत्ती करण्यात आली. तसेच तृणधान्याच्या वापराबाबत प्रसिद्धीसाठी घोषणा देण्यात आल्या. मिलेट मँन राहुल जाधव व पौष्टिक तृणधान्य रथ हे रँलीचे मुख्य आर्कषण होते. या रँलीत मोठ्या संख्येत विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी पौष्टिक तृणधान्याची आवड निर्माण व्हावी यासाठी विद्यार्थी यांना हुरडा, नाचणी, राजगीरा यापासुन बनविण्यात आलेले प्रदार्थाचे विद्यार्थी यांना आल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. यावेळी कृषीचे उपविभागीय अधिकारी एस. के. भोसले, मुख्याध्यापक भालेराव, तंत्र अधिकारी विवेक गुडुप, तालुका कृषी अधिकारी एस. एम. गायकवाड, कळंबचे बी. बी. जाधव, वाशीचे राजाराम बर्वे, परंडा एम. ए. पाटील यांच्यासह भूम, परंडा, वाशी, कळंबचे कृषी विभागाचे कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.


 
Top