परंडा (प्रतिनिधी) - विश्वभूषण, बोधीसत्व, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त परंडा येथील रेवनी मंडई भीमनगर येथे भीम प्रतिष्ठानच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष राहुल बनसोडे, सामाजिक नेते तानाजी शिंदे, मोहन दादा बनसोडे, अण्णासाहेब बनसोडे, मा.नगरसेवक रत्नाकांत शिंदे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन कराण्यात आले. यावेळी समता परिषदेचे जिल्हा अध्यक्ष बिभिषण खुणे, सावता परिषदेचे शिवाजी येवारे, भाग्यवंत शिंदे, दिव्यांग सेल चे जिल्हा उपाध्यक्ष घनश्याम शिंदे, शिवाजी शिंदे,भाग्यवंत शिंदे,प्रकाश शिंदे, अभिजीत शिंदे, आशुतोष माने, तुकाराम चौथमहाल, राहुल भोसले, महादेव लोकरे, सिद्धांत वाघमारे, मधुकर सुरवसे, नागसेन चौथामहल, प्रतिक बनसोडे, ऋषिकेश बनसोडे, बुद्धपाल शिंदे, बालाजी ठोसर, सुरेश बनसोडे ,भीमा शिंदे, रुपेश बनसोडे, रोहीत शिंदे, अक्षय बनसोडे,अण्णा बुवा बनसोडे, बालाजी गायकवाड, गणेश मदने, ऋषिकेश बुरुंगे, ऋषिकेश फले, लालासाहेब नगरे, वैभव ओहाळ, गोकुळ चौथमहाल, आदी भीमसैनिक, भीम अनुयायी आदी उपस्थित होते.


 
Top